चारभिंती परिसरात झालेल्या वादातून तिघांकडून अल्पवयीन युवकाच्या डोक्यात फायटरने वार

by Team Satara Today | published on : 06 November 2026


सातारा : चारभिंती परिसरात झालेल्या वादातून 17 वर्षीय मुलावर तिघांनी हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. मारहाणीदरम्यान एका संशयिताने फायटरने मुलाच्या डोक्यावर प्रहार केल्याने तो जखमी झाला. याप्रकरणी सातारा शहर पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत सातारा तालुक्यातील एका गावात राहणार्‍या 17 वर्षीय मुलाने फिर्याद दिली आहे. विक्रम जयसिंग मदने (रा. शिवथर), गणेश आनंद लवके (रा. शेळकेवाडी) आणि अविनाश सुनील पवार (रा. सदर बाजार, सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चारभिंती परिसरात असताना त्याने देवराजला येथे कशासाठी बोलावले, अशी विचारणा आरोपींकडे केली. या प्रश्नाचा राग आल्याने तिघांनी त्याच्याशी वाद घालत हाताने तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. शिवीगाळ करून दमदाटीही करण्यात आली. याचवेळी अविनाश पवार याने जवळील फायटरने फिर्यादीच्या डोक्यावर वार केला. दि. 4 रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास हा प्रकार घडला. पोलीस हवालदार गुरव पुढील तपास करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कराड येथील कृषीकन्या शेतकऱ्यांना देणार तंत्रज्ञानाचे धडे; ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत येडेनिपाणी गावाला भेट
पुढील बातमी
सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी एका युवकावर गुन्हा दाखल

संबंधित बातम्या