भारतीय जनता पार्टीच्या अनुसूचित जमाती मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी सदाशिव नाईक

by Team Satara Today | published on : 06 November 2026


सातारा : रामोशी समाजाच्या उनत्तीसाठी सातत्याने कार्यरत असलेले महाराष्ट्र राज्य स्वाभिमानी रामोशी महासंघाचे संस्थापक, सामाजिक कार्यकर्ते सदाशिवराव नाईक यांची महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीच्या अनुसूचित जमाती मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
भारतीय जनता पार्टीच्या मुंबई येथील कार्यालयात भारतीय जनता पार्टी अनुसूचित जमाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते सदाशिवराव नाईक यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. 

यावेळी भारतीय जनता पार्टीचे अनुसूचित जमाती मोर्चाचे मल्हार मोरे (नांदेड), सुरज मडावी (गडचिरोली), ॲड सुरेश काळे (जालना), अशोक चव्हाण (नांदेड), जितेंद्र कुलसंगे आणि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.   
भटक्या व वंचित समुहातील नागरिकांच्या येणाऱ्या समस्य सोडवणे, त्यांना मुख्य प्रवाहात सामील होण्यासाठी बळकटी देणेतसेच युवक, युवतींना शिक्षण, रोजगार, बेघरांना घरे मिळवून देवून सामाजिक न्याय मिळवून देण्याचे काम करावेयासाठी नाईक यांची निवड करण्यात आली असल्याचे डॉ. देवराव होळी सांगितले व त्यांना शुभेच्छा व्यक्त केल्या.
पक्षाची ध्येयधोरणे तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवण्याबरोबरच त्यांच्या विकासासाठी भारतीय जनता पार्टीतील वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत राहणार असून संघटना वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही सदाशिवराव नाईक यांनी यावेळी दिली. 
या निवडीबद्दल सदाशिव नाईक यांचे खा. उदयनराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, भाजप जिल्हाध्यक्ष आ. डॉ. अतुलबाबा भोसले व भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
गुंफण दिवाळी अंकाचे दिमाखात प्रकाशन

संबंधित बातम्या