सदर बझार परिसरातून दुचाकीची चोरी; सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद

by Team Satara Today | published on : 03 November 2026


सातारा : सदर बझार परिसरातून दुचाकीची चोरी केल्याप्रकरणी अज्ञाता विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 28 ते 29 ऑक्टोबर दरम्यान प्रवीण वसंतराव शिंदे (रा. कांगा कॉलनी, सदर बझार, सातारा) यांची पार्किंगमध्ये पार्क केलेली दुचाकी क्र. एमएच 50 बी 5881 अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. पुढील तपास महिला पोलीस हवालदार सूर्यवंशी करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सदर बझार येथील श्री स्वामी समर्थांच्या मंदिरामधील दानपेटी फोडून देणगीची चोरी; अज्ञातावर गुन्हा
पुढील बातमी
सिटी पोलीस लाईन येथे संशयितरित्या अस्तित्व लपवल्या प्रकरणी एकावर गुन्हा

संबंधित बातम्या