सदर बझार येथील श्री स्वामी समर्थांच्या मंदिरामधील दानपेटी फोडून देणगीची चोरी; अज्ञातावर गुन्हा

by Team Satara Today | published on : 03 November 2026


सातारा : मंदिराची दानपेटी फोडून त्यातील देणगीची चोरी केल्याप्रकरणी अज्ञाता विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 2 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास सदर बझार येथील श्री स्वामी समर्थांच्या मंदिरा मधील दानपेटी अज्ञाताने फोडून त्यातील नऊ हजार चारशे रुपये चोरून नेले आहेत. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास महिला पोलीस हवालदार सावंत करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
नांदगाव येथील कृष्णा नदी पात्रातील मोटार पंपाची केबल चोरी प्रकरणी अज्ञातावर गुन्हा
पुढील बातमी
सदर बझार परिसरातून दुचाकीची चोरी; सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद

संबंधित बातम्या