सातारा बसस्थानकामधून दुचाकीची चोरी; अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

by Team Satara Today | published on : 02 November 2026


सातारा : बसस्थानकामधून दुचाकीची चोरी केल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा बसस्थानकामधून अज्ञात चोरट्याने एमएच 11 एक्यू 1672 या क्रमांकाची दुचाकी चोरुन नेली. ही घटना दि. 21 ऑक्टोबर रोजी घडली आहे. याप्रकरणी शोएब अल्लाउद्दीन पटेल (वय 22, रा.संभाजीनगर, सातारा) यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पुढील तपास महिला पोलीस हवालदार कदम करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
दोन जणांना मारहाण केल्याप्रकरणी एका विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पुढील बातमी
जिल्ह्यातील धरणांमधील पाण्याचे समन्यायी वाटप करा; पिण्याचे पाणी राखीव ठेवावे - पालकमंत्री शंभूराज देसाई, कालवा सल्लागार समितीची बैठक संपन्न

संबंधित बातम्या