ग्राहक पंचायतीच्या सातारा शहराध्यक्षपदी निवडीबद्दल रवींद्र औताडे यांचा समता ज्येष्ठ नागरिक संघातर्फे सत्कार

by Team Satara Today | published on : 01 November 2026


सातारा : शाहूपुरीतील निवृत्त शासकीय अधिकारी व सामाजिक कार्यकर्ते रवींद्र औताडे यांची ग्राहक पंचायतीच्या सातारा शहराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल समता ज्येष्ठ नागरिक संघातर्फे सत्कार करण्यात आला.
शाहूपुरीतील समता ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मारुती कदम यांच्या हस्ते रवींद्र औताडे यांचा सत्कार करुन त्यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी समता ज्येष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष रंगराव जाधव, सचिव कृष्णा चव्हाण, खजिनदार हिरोजी माने, संचालक उत्तम पोळ, सुभाष गुरसाळकर, सुनील घाडगे, कालीदास पांढरपट्टे, वैभव गोसावी, सौ. संगीता साळवी तसेच सभासद व नागरिक उपस्थित होते.
यावेळी रवींद्र औताडे म्हणाले, ग्राहक पंचायत ही ग्राहकांच्या हितासाठी कार्यरत आहे. त्यामुळे नागरिकांना काही समस्या आल्यास त्यांनी ग्राहक पंचायतीशी संपर्क साधावा. ग्राहक पंचायतीच्या माध्यमातूनागरिकांना येणाऱ्या समस्या सोडवण्याचे काम निश्चितपणे केले जाईल.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना त्यांच्या पदावरून हटवण्यात येईल आणि त्यांना तुरुंगात जावं लागेल; राहुल गांधी यांचा इशारा
पुढील बातमी
फटाक्यांऐवजी सर्जनशील ज्ञान दीपावली साजरी करा; साहित्यवेल प्रकाशनचे संचालक प्रा. डॉ. सुभाष वाघमारे यांचे आवाहन

संबंधित बातम्या