सातार्‍यातील सदरबझार येथे पोलिसांनी बालविवाह रोखला; सहा जणांविरोधात गुन्हा

by Team Satara Today | published on : 01 November 2026


सातारा : सातार्‍यातील सदरबझार येथे पोलिसांनी बालविवाह रोखला. याप्रकरणी सहा जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मुलगी अल्पवयीन आहे हे माहित असतानाही विवाह सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेवून त्यांच्याकडे चौकशी केली. तसेच मुलीच्या जन्माची कागदपत्रे तपासली. यामध्ये मुलीचे वय कमी असल्याने पोलिसांनी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला.  पुढील तपास पोलीस उप निरीक्षक पाटोळे करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अल्पवयीन मुलीचा विनयभंग प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात एकावर पोक्सोंतर्गत गुन्हा
पुढील बातमी
गोडोली परिसरातून दुचाकीची चोरीप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद

संबंधित बातम्या