सातारा : डॉक्टर पतीला मारहाण केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात पत्नी विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पत्नी विरुद्ध सातारा शहरातील एका डॉक्टर पतीने तक्रार दिली आहे. ही घटना दि. 31 ऑक्टोबर रोजी घडली आहे. मुलाला खेळायला घेवून जा, या कारणातून पत्नीने स्टीलच्या पाईपने मारहाण केली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस हवालदार डमकले करीत आहेत.
डॉक्टर पतीला मारहाण केल्याप्रकरणी पत्नीवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा
by Team Satara Today | published on : 01 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा