सातारा : एकास मारहाण करुन जखमी केल्याप्रकरणी चार जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ही घटना दि. 30 ऑक्टोबर रोजी अजिंठा चौक येथे घडली आहे. मारहाण केल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहेत. गोटू जाधव, ऋषभ कदम, अनोळखी दोघे यांच्या विरुध्द दत्तात्रय काशिनाथ असवरे (वय 25, रा.प्रतापसिंहनगर, सातारा) यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार वाघमारे करीत आहेत.
अजिंठा चौक येथे एकास मारहाण केल्याप्रकरणी चारजणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा
by Team Satara Today | published on : 01 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा