सातारा : जागेच्या वादातून मारहाण केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कोयत्याने मारहाण केल्याप्रकरणी ऋषी भोसले व संजीवन भोसले (रा. सातारा) या दोघांविरुध्द अक्षय त्रिंबक बर्गे (वय 32, रा. खोकडवाडी, ता. सातारा) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. दुसरी तक्रार ऋषीकेश संजीवन भोसले यांनी सुभाष जाधव, निलेश जाधव, अक्षय बर्गे (रा. दौलतनगर, सातारा) यांच्या विरुध्द शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पुढील तपास सहा. फौजदार भिंगारदेवे करीत आहेत.
जागेच्या वादातून केल्याप्रकरणी पाचजणांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल
by Team Satara Today | published on : 01 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा