अतितमध्ये महामार्गावरील सिमेंट ब्लॉक ठरला जीवघेणा; 20 वर्षीय इचलकरंजीच्या दुचाकीस्वाराचा मृत्यू

by Team Satara Today | published on : 31 October 2026


सातारा : पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर अतित गावच्या हद्दीत दुचाकी सिमेंट कॉंक्रीट ब्लॉकला धडकल्याने झालेल्या अपघातात 20 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. त्याच्यासोबत दुचाकीवरून प्रवास करणारा मित्र जखमी झाला. 7 ऑक्टोबर रोजी रात्री सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास उड्डाणपुलाजवळ हा अपघात घडला.
अक्षय भीमराव पडियार (वय 20, रा. इचलकरंजी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) असे मृत तरुणाचे नाव आहे. अक्षय हा केटीएम दुचाकीवरून कराडहून सातार्‍याच्या दिशेने जात होता. सोहेल रमजान नाईकवडी (वय 21) हा त्याच्या पाठीमागे बसला होता. अतित येथील उड्डाणपुलाजवळ अक्षयचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि दुचाकी सर्व्हिस रोडलगत असलेल्या सिमेंट कॉंक्रीट ब्लॉकला धडकली. या धडकेत अक्षयचा मृत्यू झाला, तर सोहेल  जखमी झाला. दुचाकीचेही नुकसान झाले. बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून श्रेणी पोलीस उपनिरीक्षक काझी तपास करीत आहेत


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
शेंद्रेतील स्क्रॅप दुकानात चोरीचा प्रयत्न; 19 वर्षीय तरुणीविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा
पुढील बातमी
पैशांच्या व्यवहारातून साताऱ्यातील स्क्रॅप व्यावसायिकाला धमकी देणाऱ्या दोघांवर गुन्हा

संबंधित बातम्या