सातारा जिल्हा पोलीस दलातील ४६ अंमलदारांना पदोन्नती; २४ जणांना श्रेणी पोलीस उपनिरीक्षक, ११ जणांना सहायक उपनिरीक्षक, ११ पोलीस हवालदारपदी

by Team Satara Today | published on : 31 October 2026


सातारा : सातारा जिल्हा पोलीस दलातील ४६ पोलीस अंमलदारांना विविध पदांवर पदोन्नती देण्यात आली आहे. यामध्ये २४ सहायक पोलीस उपनिरीक्षकांना श्रेणी पोलीस उपनिरीक्षकपदी, ११ पोलीस हवालदारांना सहायक पोलीस उपनिरीक्षकपदी, तर ११ पोलीस नाईक व पोलीस शिपायांना पोलीस हवालदारपदी बढती देण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी ३१ ऑक्टोबर रोजी याबाबतचे आदेश जारी केले.
शासनाच्या गृहविभाग तसेच सामान्य प्रशासन विभागाने वेळोवेळी जारी केलेल्या शासन निर्णयांमधील निर्देश आणि विहित अटींच्या अधीन राहून या पदोन्नत्या करण्यात आल्या आहेत. श्रेणी पोलीस उपनिरीक्षकपदासाठी गृहविभागाच्या २५ फेब्रुवारी २०२२ च्या शासन निर्णयातील तरतुदींचे पालन करण्यात आले आहे. तसेच सहायक पोलीस उपनिरीक्षक आणि पोलीस हवालदार पदोन्नतीसाठी सामान्य प्रशासन विभागाच्या संबंधित शासन निर्णयांचा आधार घेण्यात आला आहे.
या पदोन्नतीमुळे जिल्हा पोलीस दलातील ४६ कर्मचाऱ्यांना सेवेत पुढील पदावर काम करण्याची संधी मिळाली आहे. पदोन्नती झालेल्या कर्मचाऱ्यांचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर आणि पोलीस उपअधीक्षक (गृह) कृष्णकुमार जाधव यांनी अभिनंदन करून पुढील सेवेसाठी शुभेच्छा दिल्या.
पदोन्नती झालेल्या कर्मचाऱ्यांची पदनिहाय यादी पुढीलप्रमाणे -
पोलीस उपनिरीक्षकपदी (२४)
अफसर इनामदार, प्रकाश माने, आनंदराव भोईटे, नंदकुमार घाटगे, रविकांत ढाणे, महेश कदम, दीपक जाधव, मनोहर सुर्वे, हिमेश माने, संजय साबळे, संजय जाधव, सुनील गायकवाड, तानाजी घोरपडे, प्रकाश कदम, महेश कमाने, रविंद्र कदम, प्रवीण शिंदे, उज्वला कुंभार, कांतीलाल नवघणे, जनार्दन खंडाळे, संजय चव्हाण, संजय मदने, दीपक बर्गे आणि संजय सपकाळ.
सहायक पोलीस उपनिरीक्षकपदी (११)
आनंदा कदम, दत्तात्रय लोखंडे, काकासाहेब पाटील, संतोष शिंदे, प्रतिभा कर्पे, रियाज शेख, सचिन देशमुख, महादेव घाडगे, प्रवीण चव्हाण, मल्हारी भिसे आणि दादासो यादव.
११ पोलीस अंमलदारांना हवालदारपदी बढती
पोलीस नाईक व पोलीस शिपाई पदावर कार्यरत असलेल्या पुढील ११ अंमलदारांना पोलीस हवालदारपदी पदोन्नती देण्यात आली आहे. संदीप आप्पासो जाधव, हेमंतकुमार नेताजी ढाणे, संदीप शिवाजी इंगळे, ज्ञानेश्वर अर्जुन टिंगरे, राकेश लालासाहेब घाडगे, अनिलकुमार दादासाहेब खाडे, सागर शिवाजी रासकर, संदीप शंकर फणसे, सुधीर मुरलीधर वाघमारे, बाळकृष्ण रमेश नष्टे, दत्तात्रय एकनाथ धायगुडे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
ट्रक, ट्रॅक्टर-ट्रॉलींना रिफ्लेक्टर लावण्याबाबत सातारा तालुका पोलिसांकडून जनजागृती उपक्रम; सुरक्षित वाहतुकीच्या नियमांबाबत मार्गदर्शन
पुढील बातमी
नशामुक्त भारत अभियानांतर्गत सातारा जिल्हा पोलीस दलातर्फे जनजागृती सायकल रॅली उत्साहात

संबंधित बातम्या