मुंबई : दिवाळीच्या सुट्यांमध्ये वाढणारी प्रवासी गर्दी लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) मुंबई विभागाने जादा बसफेऱ्यांचे नियोजन केले आहे. मुंबई, परळ, कुर्ला नेहरूनगर, पनवेल आणि उरण आगारांतून राज्यातील विविध भागांसाठी जादा बस सोडण्यात येणार आहेत. दिवाळी हंगामातील ही विशेष वाहतूक १ ते २२ नोव्हेंबरदरम्यान चालविण्याचे नियोजन आहे.
दिवाळीच्या काळात एसटीच्या उत्पन्नात मोठी वाढ होत असल्याने प्रवाशांच्या सोयीबरोबरच उपलब्ध वाहतूक क्षमतेचा जास्तीत जास्त वापर करण्याच्या सूचना आगारांना देण्यात आल्या आहेत. मध्यवर्ती कार्यालयाने मंजूर केलेल्या तसेच मुंबई विभागाने नियोजित केलेल्या जादा फेऱ्या गर्दीनुसार सुरू करण्यात येणार आहेत.
मध्यवर्ती कार्यालयाच्या मंजुरीनुसार मुंबईहून तुळजापूर आणि कोल्हापूर, परळहून परळी, कुर्ला नेहरूनगरहून पिंपळगाव रोठा-पारनेर आणि सातारा-कोल्हापूर, पनवेलहून जळगाव-चोपडा व शिडों, तर उरणहून अक्कलकोट आणि सांगोला या मार्गावर जादा वाहतुकीचे नियोजन आहे. याशिवाय मुंबई विभागाकडून परळ-भगवानगड, परळ-शिर्डी, पनवेल-तासगाव, पनवेल/वाशी-कराड आणि पनवेल वाशी-सातारा या मार्गावरही अतिरिक्त फेऱ्या चालविण्यात येणार आहेत.
दिवाळीच्या सुट्यांमध्ये वाढणारी प्रवासी गर्दी लक्षात घेऊन लालपरीच्या जादा फेऱ्या; मुंबई विभागाचा मोठा निर्णय
by Team Satara Today | published on : 31 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा