सातारा : भारत निवडणूक आयोगाने विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाचा कालावधी सुधारित करण्यात आला आहे. वेळापत्रकानुसार, मतदार यादीसंदर्भात दावे व हरकती दाखल करण्याचा कालावधी १३ नोव्हेंबर २०२६ पर्यंत निश्चित करण्यात आला आहे.
तसेच नोटीस टप्पा पूर्ण करणे व प्राप्त झालेले दावे आणि हरकती निकालात काढण्याची प्रक्रिया २५ नोव्हेंबर २०२६ पर्यंत पार पडणार आहे. या सर्व प्रक्रियेनंतर अंतिम मतदार याद्यांची प्रसिद्धी ३० नोव्हेंबर २०२६ रोजी केली जाणार आहे, अशी माहिती अवर सचिव तथा उपमुख्य निवडणूक अधिकारी प्रशांत नावगे यांनी दिली आहे.
मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाचे सुधारीत वेळापत्रक जाहीर
by Team Satara Today | published on : 30 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा