सातारा : बालकांचे आरोग्य सुदृढ करण्यासह कुपोषणाच्या समस्येवर प्रभावीपणे मात करण्यासाठी सातारा जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने महत्त्वपूर्ण पावले उचलण्यात येत आहेत. पूरक पोषण आहार अधिक सकस, पौष्टिक व आरोग्यपूरक करण्यासाठी आहारातील घटकांमध्ये आवश्यक बदल करण्याचा पुढाकार घेण्यात आला असून, कुपोषणमुक्त सातारा’ या नाविन्यपूर्ण अभियानासाठी जिल्हा परिषद सेस फंडातून दि.29 ऑक्टोंबर 2026 रोजी झालेल्या महिला व बालकल्याण समितीच्या बैठकीमध्ये कुपोषित बालकांसाठी 15 लाख रुपयांची तरतूद करण्याबाबतचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे.
तसेच दि.12 मे 2026 रोजी झालेल्या महिला व बालकल्याण विषय समितीच्या बैठकीमध्ये समितीच्या सभापती सौ. ऋतुजाताई शिंदे यांनी पूरक पोषण आहारातील पांढर्या वाटाण्याऐवजी चणा (हरभरा) देण्याबाबत सूचना केली होती. याबाबत शासनस्तरावर धोरणात्मक विचार करून आवश्यक मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्याची विनंती आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, मुंबई यांना करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेमार्फत दिनांक 14 जुलै 2026 रोजी एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्त, मुंबई यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आला. या प्रस्तावास सकारात्मक प्रतिसाद देत आयुक्तांनी दिनांक 31 जुलै 2026 रोजी पांढर्या वाटाण्याऐवजी हिरवा वाटाणा, चणा किंवा चवळी देण्यास मान्यता दिली आहे.
तसेच राज्याचे मुख्यमंत्री महोदय यांच्या सूचनेनुसार बाळाचे पहिले 1000 दिवस’ या संकल्पनेअंतर्गत बालकांच्या आरोग्य आणि पोषणाला विशेष प्राधान्य दिले जात असून सातारा जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती ऋतुजाताई शिंदे व सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती याशनी नागराजन यांचे मार्गदर्शनाखाली सातारा जिल्ह्यात आरोग्य विभाग आणि महिला व बालकल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सहा वर्षांपर्यंतच्या बालकांचे आरोग्यविषयक सर्वेक्षण (डलीशशपळपस) करण्यात येत आहे. या माध्यमातून कुपोषित बालकांची ओळख करून त्यांना कुपोषणाच्या चक्रातून बाहेर काढण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जाणार आहेत. यासाठी कुपोषणमुक्त सातारा अभियान सातारा जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणार आहे.सातारा जिल्हा परिषदेमार्फत नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून बालकांचे आरोग्य, पोषण आणि सर्वांगीण विकास यांना प्राधान्य दिले जात आहे. पोषण आहारातील गुणवत्तावाढ, कुपोषित बालकांसाठी विशेष आर्थिक तरतूद आणि आरोग्य विभागाच्या समन्वयातून राबविण्यात येणारे सर्वेक्षण या उपक्रमांमुळे कुपोषणमुक्त सातार्याच्या दिशेने जिल्ह्याची वाटचाल अधिक गतिमान होणार आहे.
प्रत्येक बालकाला सकस आहार, उत्तम आरोग्य आणि निरोगी बालपण मिळणे हा आमचा संकल्प
कुपोषण ही केवळ आरोग्याची समस्या नसून आपल्या पुढील पिढीच्या भविष्याशी निगडित बाब आहे. त्यामुळे बालकांना दिला जाणारा पोषण आहार अधिक पौष्टिक आणि आरोग्यपूरक करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. पांढर्या वाटाण्याऐवजी हिरवा वाटाणा, चणा व चवळीचा पर्याय उपलब्ध करून घेण्यास मान्यता मिळाली आहे. तसेच साखरेऐवजी गुळाचा वापर करण्याबाबतही शासनस्तरावर पाठपुरावा सुरू आहे. कुपोषणमुक्त सातारा’ अभियानासाठी 15 लाख रुपयांची तरतूद करून कुपोषित बालकांना विशेष पोषण सहाय्य देण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशासन, आरोग्य यंत्रणा, अंगणवाडी सेविका आणि पालक यांच्या एकत्रित प्रयत्नांतून सातारा जिल्ह्यातील प्रत्येक बालक सुदृढ व निरोगी व्हावे, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. कारण निरोगी बालक हीच समृद्ध सातार्याची खरी ओळख आहे.
सौ. ऋतुजाताई शिंदे, सभापती, महिला व बालकल्याण समिती, सातारा जिल्हा परिषद, सातारा
कुपोषणमुक्त सातार्यासाठी जिल्हा परिषदेचा पुढाकार; कुपोषित बालकांसाठी 15 लाखांची तरतूद करण्याचा महत्वपूर्ण निर्णय
by Team Satara Today | published on : 30 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा