सातारा : रायगड जिल्ह्यातील तीन आरोपी कारसह तासवडे टोल नाक्यावर ताब्यात घेण्यात आले. तळबीड पोलिसांच्या तत्परतेने ही कारवाई पार पडली.
रायगड जिल्ह्यातील खोपोली पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी हे रायगड जिल्ह्यातील खोपोली पोलीस ठाणे हद्दीत गुन्हा करून कराडच्या दिशेने येत असल्याची गोपनीय माहिती तळबीड पोलीस ठाण्यास प्राप्त झाली होती. माहितीचे गांभीर्य ओळखून तळबीड पोलीस ठाण्याच्या पथकाने तात्काळ हालचाली करून तासवडे टोल नाका येथे सापळा रचला. मिळालेल्या माहितीच्या आधारे पांढर्या रंगाची चारचाकी ह्युंदाई वेरना कार अडवून त्यामधील एकूण तीन आरोपींना वाहनासह ताब्यात घेण्यात आले.
परजिल्ह्यातील गुन्ह्यातील आरोपींच्या हालचालींबाबत माहिती मिळताच तातडीने समन्वय साधून योग्य ठिकाणी सापळा रचत तीन आरोपींना वाहनासह ताब्यात घेण्याची कामगिरी तळबीड पोलीस पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. सदरची कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, कराडच्या उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व तळबीड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री. रविंद्र भोरे यांच्या नेतृत्वाखाली पीएसआय सुभाष फडतरे, कॉ. राघू खाडे, योगेश भोसले, सचिन गुरव, अभय मोरे, प्रवीण गायकवाड, संजय मासाळ यांनी केली.
रायगड जिल्ह्यातील तीन आरोपी कारसह तासवडे टोल नाक्यावर ताब्यात; तळबीड पोलिसांची तत्पर कारवाई
by Team Satara Today | published on : 30 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा