जिल्हा शासकीय रुग्णालयासमोर भांडणे सोडविण्यास गेलेल्या पोलिसांना काठीने मारहाण, साताऱ्यातील घटना; सातजणांवर गुन्हा दाखल

by Team Satara Today | published on : 30 October 2026


सातारा : जमावाकडून एका व्यक्तीला मारहाण होत असताना त्यांना अडवल्याच्या कारणावरून उलट पोलिसांनाच हाताने व काठीने मारहाण करण्यात आली. ही धक्कादायक घटना जिल्हा शासकीय रुग्णालयासमोर दि. २७ रोजी रात्री सातच्या सुमारास घडली. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात सात जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
उत्कर्ष रेपाळ, आदिती रेपाळ, आदित्य रेपाळ, अंकुश उत्कर्ष रेपाळ (सर्व रा. सदरबझार), तेजस खंडू लवटे (रा. खेड), आर्यन तुपे (रा. जुना आरटीओ चौक, सातारा) व एका अनोळखी युवकाचा गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये समावेश आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जिल्हा शासकीय रुग्णालय, सातारा येथील अपघात विभागासमोर एका व्यक्तीला वरील संशयित मारहाण करत होते.
त्यावेळी तेथे कर्तव्य बजावत असलेले पोलिस कॉन्स्टेबल अनिकेत बनकर व महिला पोलिस घार्गे यांनी ‘त्या’ व्यक्तीला मारू नका, असे म्हटले. त्यांना अडवत असताना आरोपींनी कॉन्स्टेबल बनकर व महिला पोलिस घार्गे यांच्या अंगावर धावून जात त्यांना हाताने तसेच काठीने मारहाण करून आरोपींनी शासकीय कामात अडथळा आणला. या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल अनिकेत बनकर यांनी फिर्याद दिली असून, सहायक पोलिस निरीक्षक बिले हे अधिक तपास करत आहेत.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कायदा हातात घेतल्यास राजू शेट्टी यांच्यावर कारवाई : ना. शंभूराज देसाई, वस्तुस्थितीची माहिती न घेता राजू शेट्टी यांच्याकडून भूमिका मांडली जात असल्याचा टोला
पुढील बातमी
सैनिक स्कूलमध्ये २६ नोव्हेंबरला रंगणार चित्तथरारक ‘एअर शो’; जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे काटेकोर नियोजनाचे निर्देश

संबंधित बातम्या