महिलेचे सोन्याचे गंठण लंपास करणाऱ्या महिलेस अटक; फसवणुकीच्या गुन्ह्याचा उलगडा करण्यात बोरगाव पोलिसांना यश

by Team Satara Today | published on : 30 October 2026


सातारा : लग्नाचे आमिष दाखवून एका महिलेचा विश्वास संपादन करत तिच्याकडील ४ लाख २० हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण लंपास केल्याप्रकरणी बोरगाव पोलिसांनी महिलेस अटक केली. फसवणूक करून हस्तगत केलेले सुमारे ३२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण पोलिसांनी हस्तगत केले आहे. या कारवाईमुळे फसवणुकीच्या गुन्ह्याचा उलगडा करण्यात बोरगाव पोलिसांना यश आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २६ जून २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास वळसे, ता.सातारा येथे ही घटना घडली. याबाबतची फिर्याद सौ.वर्षा पांडुरंग कदम (रा. वळसे, ता. सातारा) यांनी दिली होती. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार संशयित शोभा संजय शेडगे व तुषार संजय शेडगे (दोघेही रा. वळसे, ता. जि. सातारा; मूळ रा. अंगापूर, ता. जि. सातारा) यांनी भावनिकरीत्या विश्वास संपादन करून सोन्याचे गंठण घेतले. त्यानंतर गंठण परत मागितले असता, खोट्या पोलीस केसची धमकी देत गंठण परत देण्यास नकार दिल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सपोनि प्रशांत हुले व त्यांच्या डी.बी. पथकाने तपास सुरू केला. संशयित महिलेस अटक करण्यात आली. ही कारवाई सातारा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि प्रशांत हुले, पोलीस उपनिरीक्षक मच्छिंद्रनाथ पाटील, डी.बी. पथकातील हवालदार निलेश गायकवाड, दीपककुमार मांडवे, पोलीस नाईक प्रशांत चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल धीरज महाडिक आदींनी केली. पुढील तपास महिला पोलीस हवालदार मनिषा म्हेत्रे करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
फुले दाम्पत्याचा समतेचा लढा नव्या पिढीने पुढे न्यावा : यशेंद्र क्षीरसागर, शाहूपुरी माध्यमिक विद्यालयात व्याख्यान
पुढील बातमी
दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय; सहकारी संस्थांतील राजकीय घडामोडींना ब्रेक

संबंधित बातम्या