सातारा एसटी स्टॅन्ड परिसरात वृद्ध महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी अज्ञात महिलांवर गुन्हा

by Team Satara Today | published on : 29 October 2026


सातारा : वृद्ध महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी दोन अज्ञात महिलांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा एसटी स्टॅन्ड परिसरात अज्ञात दोन महिलांनी वृद्ध महिलेचा विश्वास संपादन करुन हातचलाखीने 15 हजार रुपये किंमतीचे मणीमंगळसूत्र चोरुन नेले. ही घटना दि. 24 ऑक्टोबर रोजी घडली आहे. याप्रकरणी कुसुम अंकुश जमदाडे (वय 78, रा. लिंब ता.सातारा) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पुढील तपास पो. हवा. मोरे करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातार्‍यातील करंजे येथे दुचाकी जाळल्याप्रकरणी अज्ञातांवर गुन्हा
पुढील बातमी
विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी सासरच्या पाचजणांवर गुन्हा

संबंधित बातम्या