सातारा : सातार्यातील करंजे येथे अज्ञात तिघांनी दुचाकी जाळल्याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, किरण चंद्रकांत वाडकर (वय 33, रा.करंजे) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. दि. 28 ऑक्टोबर रोजी पहाटे साडेतीन वाजता ही घटना घडली आहे. एमएच 11 बीपी 5548 असा दुचाकीचा क्रमांक असून त्याचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. पुढील तपास पो. हवा. माने करीत आहेत.
सातार्यातील करंजे येथे दुचाकी जाळल्याप्रकरणी अज्ञातांवर गुन्हा
by Team Satara Today | published on : 29 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा