सातारा : शिवीगाळ, दमदाटी प्रकरणी तीन जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातार्यात मुलाच्या खिशात पेटता फटाका टाकल्याने तो जखमी झाला. ही घटना शाहूनगर येथे दि. 26 ऑक्टोबर रोजी घडली आहे. याबाबतचा जाब विचारल्यानंतर तक्रारदार व त्यांच्या कुटुंबियांनी शिवीगाळ केली. सातारा शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पो. हवा. पाटोळे करीत आहेत.
शाहूनगर येथे शिवीगाळ, दमदाटी प्रकरणी तीन जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार
by Team Satara Today | published on : 29 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा