सातारा : खंडणी, जबरी चोरीसह नुकसान केल्याप्रकरणी एका विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 26 रोजी सकाळी सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास राहुल गोरखनाथ सोनवणे (रा. मल्हार पेठ, सातारा) यांच्या घरात येऊन त्यांच्याकडे एक लाख रुपयांची मागणी करत दहा हजार रुपये खंडणीची मागणी करून सोनवणे यांच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून त्यांच्या कारचे दगड मारुन नुकसान केल्याप्रकरणी योगराज अरुण त्रिंबके (रा. मल्हारपेठ, सातारा) यांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कांबळे करीत आहेत.
खंडणीची मागणी करून सोन्याची चेन हिसकावून नेल्या प्रकरणी मल्हारपेठेतील एकावर गुन्हा
by Team Satara Today | published on : 28 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा