वृद्धाला डिजिटल अरेस्टची भीती दाखवून 32 लाख 60 हजारांची फसवणूक; चार जणांवर गुन्हा

by Team Satara Today | published on : 27 October 2026


सातारा : वृद्धाला भीती दाखवून त्याची सुमारे 32 लाख 60 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एका मोबाईल धारकासह तीन अकाउंट धारकांच्या विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 18 जून ते 5 ऑक्टोबर दरम्यान बाळू उर्फ बाळासाहेब तुकाराम भोसले (रा. कोंडवे, ता. सातारा) यांच्या मोबाईलवर एका अनोळखी नंबर वरून व्हिडिओ कॉल आला. संबंधिताने मी वरिष्ठ पोलीस अधिकारी बोलतोय, असे सांगून भोसले यांना डिजिटल अरेस्टची भीती दाखवून 32 लाख 60 हजार रुपये घेऊन भोसले यांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी संबंधित मोबाईल धारकासह ज्या अकाउंटवर पैसे भरले, त्या तीनही अकाउंट धारकांविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक तांबे करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अनुजच्या मृत्यूला जबाबदार कोण? न्यायासाठी आई-वडिलांचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एल्गार
पुढील बातमी
एका महिलेची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी दोन जणांवर बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा

संबंधित बातम्या