सातारा : अपघातात एकास जखमी केल्याप्रकरणी कार चालकाविरुद्ध शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 24 रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास करंजे ते भूविकास चौक रस्त्यावरुन आशिष विलास कांबळे (रा. तामजाईनगर, सातारा) यांच्या दुचाकीला भरधाव वेगात पाठीमागून येऊन धडक देऊन कांबळे यांना जखमी केल्याप्रकरणी कार चालकाविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार मोहिते करीत आहेत.
दुचाकीला धडक देऊन एकास जखमी केल्याप्रकरणी कार चालकावर गुन्हा
by Team Satara Today | published on : 26 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा