सातारचे मध्यवर्ती बसस्थानक आता होणार नवीन; बांधकामाच्या कामाला वेगाने प्रारंभ

by Team Satara Today | published on : 26 October 2026


सातारा : संपूर्ण महाराष्ट्रातील सध्याचे सर्वात वेगवान आणि दळणवळणासाठी मध्यवर्ती समजले जाणारे सातारचे बस स्थानक दररोज दिवस-रात्र हजारो बसेसच्या ये-जा करण्यामुळे कमी पडत आहे. हे लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने सातारा येथील मध्यवर्ती बसस्थानकाची इमारत आता नूतनीकरणासाठी घेतली आहे. त्यामुळे सध्या सातारा बस स्थानकात विश्रांतीसाठी तसेच मुक्कामासाठी येणाऱ्या अनेक बसेसची दुसऱ्या आगारांमध्ये बदली करण्यात आलेली आहे.
सध्या सातारा बस स्थानकावरील विद्यमान इमारतीला नूतनीकरणासाठी पूर्णपणे पाडले जाणार असल्यामुळे तेथे उंच पत्रे व संरक्षक कठडे उभारून या कामाला प्रारंभ झाला आहे. गेली अनेक दशके या बस स्थानकाचे महत्त्व महाराष्ट्र, कर्नाटक तसेच आंध्र प्रदेश राज्याशी निगडित असल्याने दररोज या बस स्थानकातून हजारो बसेस ये जा करत असतात .अनेक कर्नाटकच्या बसेस तर मुक्कामासाठी सातारच्या राजवाडा बसस्थानकावरही लावण्यात येतात.
सध्या या बस स्थानकाची जागा अपुरी पडत असल्यामुळे व अतिशय देखणे आणि नेटक्या स्वरूपाचे नूतनीकरण केल्यानंतर होणारी इमारत ही महामंडळाच्या मालमत्तेत तसेच एक देखण्या स्वरूपाच्या बस स्थानकात भर घालणार आहे. सध्या यासाठी सातारा शहरालगतच्या विविध गावांना ये जा करण्यासाठी बसेसचे थांबे बदलण्यात आले असून एकंदरीतच ते बस स्थानक लवकरच नव्या रूपात प्रवाशांच्या सेवेत सादर होणार आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
वकील संरक्षण कायद्यासाठी वकील बंधूंचा एल्गार; सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण; वकील संघटनांचा आंदोलनाला पाठिंबा
पुढील बातमी
दारूसाठी पैसे न दिल्याने पत्नीचा खून करणार्‍या पतीला जन्मठेप; उंब्रज पोलिसांच्या भक्कम तपासाला यश

संबंधित बातम्या