नागठाणे परिसरात बिबट्याचा वावर; नागरिकांनी मोबाईलमध्ये टिपले छायाचित्र, सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

by Team Satara Today | published on : 26 October 2026


नागठाणे : नागठाणे, ता. सातारा येथील हिराई गोल्डन सिटी या रहिवासी परिसरात शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास बिबट्या दिसून आला. काही नागरिकांनी बिबट्याचे मोबाईलमध्ये छायाचित्र टिपले असून, परिसरातील काही सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्येही त्याचा वावर कैद झाला आहे.
गेल्या दोन दिवसांत या परिसरातील तीन ते चार कुत्र्यांचा बिबट्याने फडशा पाडल्याची माहिती येथील रहिवासी व सामाजिक कार्यकर्ते प्रशांत चव्हाण यांनी दिली. लोकवस्तीत बिबट्याचा वावर आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणेही नागरिकांना धोकादायक वाटू लागले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
या पार्श्वभूमीवर वन विभागाने तातडीने घटनास्थळी पाहणी करुन बिबट्याच्या वावराचा बंदोबस्त करावा आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून होत आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
बुधवार नाका येथे जुन्या वादाच्या कारणातून मारहाण प्रकरणी परस्परविरोधी तक्रारी
पुढील बातमी
कास पठारावर आढळला दुर्मीळ आकर्षक युरोपियन नीलकंठ; पर्यावरण अभ्यासक गणेश सातव यांच्या निरीक्षणातून नोंद

संबंधित बातम्या