सातारा : आईला मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी मुलाविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 24 रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास योगेश साहेबराव जाधव (रा. माजगावकर माळ झोपडपट्टी, सातारा) याने त्याच्या आईस दारू पिण्यासाठी मोबाईल विकायला दे, असे म्हटल्यावर त्याला त्याच्या आईने विरोध केला. यानंतर योगेश हा घरातील चाकू हातात घेऊन आला. आईने तो पकडण्याचा प्रयत्न केला असता तो चाकू आईच्या पोटाला लागून ती जखमी झाली आहे. तसेच योगेश याने शिवीगाळ, दमदाटी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याबाबतची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हवालदार वाघ करीत आहेत.
आईला मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी मुलावर गुन्हा; माजगावकर माळ झोपडपट्टीतील घटना
by Team Satara Today | published on : 25 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा