दहिवडी : परतीचा मान्सून न पडल्यामुळे माण तालुक्यात मोठी दयनीय अवस्था झाली असून जनावराच्या चाऱ्याचा त्याचं बरोबर पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न गंभीर होणार आहे. ऑक्टोबर महिन्यातच ३१ गावे आणि २०० वाड्या वस्तीवरील ४५ हजार ७०२ लोकसंख्या बाधित झाली आहे तर माण तालुक्यात ३८ हजार ९७२ पशुधन बाधित असून १ शासकीय व २९ खाजगी असे एकूण ३० टँकरद्वारे पाणी पुरवले जात आहे. १० विहिरी आणि सहा बोरवेलचे आदी अधिग्रहण करण्यात आले आहे.
माण तालुक्यात दहिवडी, शिंगणापूर, म्हसवड, मार्डी, वरकुटे-मलवडी, वारुगड परिसरमध्ये टँकर सुरू आहेत. यापुढे पाऊस पडला नाही तर लोकांना रोजगार पशुधन पिण्याचे पाणी पुरवणे प्रशासनाला मोठे आव्हान ठरणार आहे. माण तालुक्यातील जवळपास दहा पाणी साठवण तलाव असून अनेक तलावामध्ये मृतसाठा असून आता पाऊस पडला नाही तर पुढे जूनपर्यंत मोठ्या समस्याला सामोरे जावे लागणार आहे.
तालुक्याला वरदान ठरणारी जिहे कटापूर व उरमोडी योजनेची पाणी सुरू असले तरी यामधील अनेक कामे अपूर्ण आहेत. आंधळी धरणाचा उजवा कालवा पूर्वी सुरू होता तो पूर्णपणे बंद आहे. या ठिकाणची लाभधारक शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या मात्र त्यांना उपाशीपोटी रहावे लागत आहे. उजव्या कालव्यातून पाणी पिंगळी तळ्यात जाणार होते परंतु तो कालवा अपूर्ण असल्याने या ठिकाणी पाणी सोडण्यात आले नाही तर याच योजनेचे पाणी म्हसवडपर्यंत जात असल्याने या पाण्याच्या मोठ्या अपेक्षा वाढल्या आहेत त्यामुळे भविष्यात मोठी टंचाई जाणवू शकते तालुक्यात असणाऱ्या दहा पाणी साठवण तलावाची आजची अवस्था पुढील प्रमाणे आहे.
प्रकल्पाचे नाव-आंधळी - उपयुक्त पाणीसाठा -७.४३ (दशलक्ष घनमीटर मध्ये), मृत पाणीसाठा -१.८५ एकूण पाणी साठा -९.२८ आज रोजी उपयुक्त पाणीसाठा -०.८० टक्केवारी-१०.७७. प्रकल्पाचे नाव-रानंद -उपयुक्त पाणीसाठा -६.४२, (दशलक्ष घनमीटर मध्ये), मृत पाणीसाठा -०.७०, एकूण पाणी साठा -७.१२, आज रोजी उपयुक्त पाणीसाठा -०.०६, टक्केवारी-०.९३. प्रकल्पाचे नाव-पिंगळी, उपयुक्त पाणीसाठा -२.३६ (दशलक्ष घनमीटर मध्ये), मृत पाणीसाठा -०.०२, एकूण पाणी साठा -२.३८, आज रोजी उपयुक्त पाणीसाठा -०.०८, टक्केवारी-३.३९. प्रकल्पाचे नाव-ढाकणी, उपयुक्त पाणीसाठा -२.६६, (दशलक्ष घनमीटर मध्ये), मृत पाणीसाठा -०.३९, एकूण पाणी साठा -३.०५, आज रोजी उपयुक्त पाणीसाठा -०.००. टक्केवारी-०.००. प्रकल्पाचे नाव-लोधवडे, उपयुक्त पाणीसाठा -०.७०, (दशलक्ष घनमीटर मध्ये), मृत पाणीसाठा -०.२९, एकूण पाणी साठा -०.९९, आज रोजी उपयुक्त पाणीसाठा -०.००, टक्केवारी-०.००, प्रकल्पाचे नाव-गंगोती, उपयुक्त पाणीसाठा -१.३६, (दशलक्ष घनमीटर मध्ये), मृत पाणीसाठा -०.४३, एकूण पाणी साठा -१.७९, आज रोजी उपयुक्त पाणीसाठा -०.००, टक्केवारी-०.००, प्रकल्पाचे नाव-जांभुळणी, उपयुक्त पाणीसाठा -२.२६, (दशलक्ष घनमीटर मध्ये), मृत पाणीसाठा -०.१५, एकूण पाणी साठा -२.४१, आज रोजी उपयुक्त पाणीसाठा -०.००, टक्केवारी-०.००. प्रकल्पाचे नाव-मासाळवाडी, उपयुक्त पाणीसाठा -२.०२, (दशलक्ष घनमीटर मध्ये), मृत पाणीसाठा -०.३९, एकूण पाणी साठा -२.४१, आज रोजी उपयुक्त पाणीसाठा -०.००, टक्केवारी-०.००, प्रकल्पाचे नाव-महाबळेश्वर वाडी, उपयुक्त पाणीसाठा -१.५०, (दशलक्ष घनमीटर मध्ये)मृत पाणीसाठा -०.५१, एकूण पाणी साठा -२.०१, आज रोजी उपयुक्त पाणीसाठा -०.००, टक्केवारी-०.००. प्रकल्पाचे नाव-जाशी, उपयुक्त पाणीसाठा -३.१६, (दशलक्ष घनमीटर मध्ये), मृत पाणीसाठा -०.३८, एकूण पाणी साठा -३.५४, आज रोजी उपयुक्त पाणीसाठा -०.१०, टक्केवारी-३.१६
चारा छावण्या किंवा चारा डेपो सुरु करणे गरजेचे
सध्याची व भविष्यातील माण तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती पाहता काही बळीराजाने आपले लाख मोलाचे पशुधनाला जनावरांच्या बाजाराकडे वाट दाखवली असून यामुळे गत दोन आठवडे म्हसवडचा जनावरांचा बाजार हाऊस फुल्ल होत आहे. तरी शासनाने शिल्लक आहे ते पशुधन वाचवायचे असेल तर ताबडतोब चारा छावण्या किंवा चारा डेपो सुरु करणे गरजेचे आहे. दुष्काळ बळीराजाला दिलासा देणे अत्यंत गरजेचे आहे.
माण तालुक्यात ३० टॅंकरने पाणीपुरवठा; पाणी पातळीमध्ये घट; तालुक्याला पाणी पुरवठ्याची गरज वाढणार
by Team Satara Today | published on : 25 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा