जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची मतदान केंद्राला भेट; सुविधांची व व्यवस्थेची पाहणी

by Team Satara Today | published on : 23 October 2026


सातारा : पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सातारा जिल्ह्यात शुक्रवारी शांततेत मतदान पार पडले. सकाळी आठ ते दुपारी चार या वेळेत झालेल्या मतदान प्रक्रियेत शिक्षक मतदारसंघात ८९.३९ टक्के, तर पदवीधर मतदारसंघात ६६.९२ टक्के मतदानाची नोंद झाली. जिल्ह्यातील १३७ मतदान केंद्रांवर प्रशासनाने आवश्यक व्यवस्था केली होती.
जिल्हाधिकारी श्री. संतोष पाटील यांनी मतदान केंद्राला भेट देऊन तेथील सुविधांची व व्यवस्थेची पाहणी केली. यावेळी मतदान केंद्रावरील मूलभूत सुविधा, आवश्यक व्यवस्था आणि निवडणूक प्रक्रियेच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
राज्यातील पशुधनासाठी चारा उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी "मिशन मुरघास" मोहीम

संबंधित बातम्या