सातारा : ट्रान्सफॉर्मर्स मधील तांब्याच्या तारेची चोरी केल्याप्रकरणी अज्ञाता विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 21 ते 22 दरम्यान वडूथ, ता. सातारा परिसरातील तीन ट्रान्सफॉर्मर मधील पन्नास हजार रुपये किंमतीची अंदाजे 110 किलो वजनाची तांब्याची तार अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. याप्रकरणी अज्ञाता विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार गायकवाड करीत आहेत.
वडूथ परिसरातील तीन ट्रान्सफॉर्मर्समधील 50 हजारांच्या तांब्याच्या तारेची चोरी; अज्ञातावर गुन्हा
by Team Satara Today | published on : 23 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा