सातारा : अपघातातील जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, चिंचणेर निंब, ता. सातारा येथील जाधव यांचा सातारा शहरातील ग्रेड सेपरेटर येथे मोटरसायकल घसरल्याने अपघात झाला होता. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात व नंतर ससून रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार पवार करीत आहेत.
अपघातातील चिंचणेर निंब येथील जखमीचा ससून रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू
by Team Satara Today | published on : 23 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा