भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे जलमंदिर पॅलेसवर स्वागत; उदयनराजेंकडून शिवरायांचे शिल्प देऊन सत्कार

by Team Satara Today | published on : 23 October 2026


सातारा : भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जलमंदिर पॅलेस येथे जाऊन खासदार उदयनराजे भोसले यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांचे स्वागत करून त्यांच्याशी विविध महत्त्वपूर्ण विषयांवर त्यांनी चर्चा केली.
या भेटीदरम्यान, राज्याच्या विकासाशी संबंधित विविध विषय, संघटनात्मक बाबी तसेच जनहिताच्या मुद्द्यांवर विचारविनिमय करण्यात आला. यावेळी खासदार उदयनराजेंनी शाल पुष्पगुच्छ व छत्रपती शिवाजी महाराजांचे शिल्प भेट देऊन रवींद्र चव्हाण यांचा सत्कार केला.
यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुल भोसले, आमदार मनोज घोरपडे, भाजप लोकसभा संयोजक सुनील काटकर, प्रतापगड प्राधिकरण समितीचे सदस्य काका धुमाळ, पालिकेचे उपाध्यक्ष दत्तात्रय बनकर, माजी नगराध्यक्षा रंजना रावत, नगरसेवक पंकज चव्हाण, दिशा समिती सदस्य विनीत पाटील, लक्ष्मण कडव, धनंजय पाटील, शिवानी कळसकर तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कुकुडवाड भागात नेपाळी गरुडाचा विहार; माण तालुक्यात पहिलीच नोंद, ‘युरोपियन नीलपंख’ पक्षीही आढळले
पुढील बातमी
धावरवाडी येथील जयवंत शुगर’समोरील वजन काटा पाडला बंद; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन; ऊसदर जाहीर करण्याची मागणी

संबंधित बातम्या