सातारा : ऊसतोडीचे काम सुरू असताना पाणी पिण्यासाठी गेलेला 23 वर्षीय तरुण परतलाच नसल्याची घटना सासपडे (ता. सातारा) येथे घडली. कृष्णा बाळू मोरे (मूळ रा. शिंदी, ता. चाळीसगाव, जि. जळगाव; सध्या रा. सासपडे) असे बेपत्ता तरुणाचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, योगेश संपत सोनवणे (वय 30, रा. मालेगाव, जि. नाशिक; सध्या रा. सासपडे) यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली. 19 ऑक्टोबर रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास गट क्रमांक 763 मधील शेतात ऊसतोड सुरू होती. विहिरीजवळील शिवारात काम करणारे मोरे पाणी पिण्यासाठी गेले. बराच वेळ होऊनही ते परतले नाहीत. सहकार्यांनी शोध घेऊनही त्यांचा ठावठिकाणा लागला नाही. त्यांचे अपहरण झाले असावे, अशी शक्यता तक्रारीत व्यक्त करण्यात आली आहे. पोलीस तपास करीत आहेत.
ऊसतोड मजुराचे अपहरण; सासपडे येथील घटना, बोरगाव पोलीस ठाण्यात तक्रार
by Team Satara Today | published on : 21 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा