सातारा : दुचाकीवरून तोल जाऊन पडल्याने गंभीर जखमी झालेल्या तानाजी गोळे यांचा पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. ही घटना 29 सप्टेंबर 2026 रोजी घडली. याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संदीप तानाजी गोळे (वय 39, रा. मालगाव, ता. जि. सातारा) यांनी याबाबत पोलिसांना खबर दिली. सातारा तालुक्यातील शिवथर येथे दुचाकीवरून जात असताना तानाजी गोळे यांचा तोल गेला आणि ते रस्त्यावर पडले. या अपघातात त्यांच्या डोक्याला, हाताला आणि पायाला दुखापत झाली होती. त्यांना उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, उपचार सुरू असताना सायंकाळी साडेसहाच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. पोलीस हवालदार गोरे पुढील तपास करीत आहेत.
अपघातातील जखमीचा पुण्यातील ससून रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू
by Team Satara Today | published on : 21 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा