सातारा : मुलीच्या विवाहावरून सुरू झालेल्या वादातून महिलेला मारहाण केल्याची घटना धनगरवाडी (ता. सातारा) येथे घडली. याप्रकरणी मोहम्मद शेख, बबलू पार्टे, तीन महिलांसह दोन ते तीन अनोळखी व्यक्तींविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आशिकी सुभाष गुंजाळ (वय 32) यांनी याबाबत फिर्याद दिली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 18 ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मुलीच्या लग्नावरून पतीसोबत त्यांचा वाद झाला. त्यानंतर शेजारी राहणार्या संशयिताने मित्रासह येऊन शिवीगाळ व धमकी दिल्याचा आरोप आहे. पुढे आणखी काही जणांना बोलावून गुंजाळ यांना मारहाण करण्यात आली. एका व्यक्तीने त्यांना धरून ठेवले, तर दुसर्याने लाकडी दांडक्याने डाव्या हातावर वार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील तपास करीत आहेत.
धनगरवाडी येथे महिलेला मारहाण केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा
by Team Satara Today | published on : 21 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा