पिंपळवाडी येथे राजकीय चर्चेचे रूपांतर हाणामारीत; कोयत्याच्या वाराने एकजण जखमी

by Team Satara Today | published on : 21 October 2026


सातारा : गावातील राजकीय विषयावरून झालेल्या वादात एका व्यक्तीवर कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना पिंपळवाडी (ता. सातारा) येथे घडली. याप्रकरणी अरविंद वामन फाळके (वय 52, रा. पिंपळवाडी) याच्याविरुद्ध सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संतोष बाळासाहेब मेणकर (वय 47) यांनी फिर्याद दिली. 20 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास गावातील अंगणवाडी शाळेच्या मोकळ्या जागेत दोघांमध्ये राजकीय चर्चा सुरू होती. त्यातून वाद झाल्यानंतर संशयिताने मेणकर यांना शिवीगाळ करून धमकी दिली. त्यानंतर कोयत्याने त्यांच्या डोक्यावर डाव्या कानाच्या वर वार केला. जखमी मेणकर यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. पोलीस निरीक्षक काटकर तपास करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सोलर प्रकल्पातील केबल चोरीचा छडा; दोघे जेरबंद, म्हसवड पोलिसांची संयुक्त कारवाई; २.५८ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
पुढील बातमी
धनगरवाडी येथे महिलेला मारहाण केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा

संबंधित बातम्या