सातारा : महिलेला पैशांचे आमिष दाखवून अश्लील बोलणे, तिच्या अंगाला हात लावून कपडे फाडल्याचा तसेच मारहाण करून दमदाटी केल्याचा प्रकार सातारा शहरात घडला. याप्रकरणी 41 वर्षीय महिलेने सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून,समर्थमंदिर येथे राहणार्या जावयाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 18 रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास समर्थ मंदिर परिसरात हा प्रकार घडला. संशयिताने फिर्यादी महिलेच्या अंगावर धावून जात, मनास लज्जा उत्पन्न होईल असे विधान करत, तुला कामासाठी पैसे देतो, असे बोलून अश्लील शिवीगाळ केली. तसेच सासूच्या शरीराला वाईट हेतुन स्पर्श लावून तिच्या अंगावरील कपडे फाडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
यावेळी संशयिताने सासूला हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ आणि दमदाटी केल्याचाही आरोप आहे.
या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोलीस हवालदार देशमुख करीत आहेत.
सातार्यात जावयाकडून सासूचा विनयभंग; मारहाण केल्याचाही आरोप, विनयभंगाचा गुन्हा दाखल
by Team Satara Today | published on : 20 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा