फलटणमध्ये भडकमकरनगर परिसरात सात लाखांचे सोन्याचे दागिने चोरीला; मुलाविरुद्ध गुन्हा दाखल

by Team Satara Today | published on : 20 October 2026


सातारा : फलटण शहरातील भडकमकरनगर परिसरातील तनिष्क रेसिडेन्सी येथील सदनिकेतून सात लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मनीषा सुरेंद्र काळेबेरे (वय 60) यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, त्यांचा मुलगा दिनेश सुरेंद्र काळेबेरे याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 4 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजल्यापासून 11 ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंतच्या कालावधीत भडकमकरनगर येथील तनिष्क रेसिडेन्सीच्या दुसर्‍या मजल्यावरील सदनिकेतील बेडरूममधून सात लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेले. फिर्यादीच्या संमतीशिवाय अज्ञात व्यक्तीने अथवा त्यांचा मुलगा दिनेश याने दागिने चोरून नेल्याची तक्रार देण्यात आली आहे.या प्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनेचा अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक शिंदे करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
खेड येथे दुचाकीस्वाराला दांडक्याने मारहाण; दोघांविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा
पुढील बातमी
सातार्‍यात जावयाकडून सासूचा विनयभंग; मारहाण केल्याचाही आरोप, विनयभंगाचा गुन्हा दाखल

संबंधित बातम्या