पोवई नाका परिसरात जुन्या भांडणातून कोयत्याने हल्ला; दोघे जखमी, चौघांविरुद्ध गुन्हा

by Team Satara Today | published on : 20 October 2026


सातारा : पोवई नाका ते वाढेफाटा रस्त्यावरील हेम एजन्सीजवळ जुन्या भांडणाच्या कारणावरून चौघांनी कोयत्याने तसेच हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून दोघांना जखमी केल्याची घटना घडली. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात चौघांसह तीन ते चार अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दांडिया कार्यक्रम संपल्यानंतर 18 तारखेला रात्री साडेदहाच्या सुमारास पोवई नाका परिसरात हा प्रकार घडला. जुन्या भांडणाच्या कारणावरून संशयितांनी मयुरेश्वर मधुकर जाधव (वय 24, व्यवसाय स्पीकर व्यावसायिक, रा. कोडोली, ता.  सातारा) यांच्यासह गौरव भिसे आणि शुभम साठे यांना कोयत्याने तसेच हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी शिवीगाळ करून दमदाटीही करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
याप्रकरणी मयुरेश्वर जाधव यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आदित्य बनसोडे (रा. कोडोली), विकास ऊर्फ पच्या कांबळे (रा. आंबेडकर भवन, बॉम्बे रेस्टॉरंटजवळ, सातारा), शुभम सवाखंडे (रा. सदर बाजार, सातारा) आणि तीन ते चार अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मार्डी येथील पवारवाडीत पती-पत्नीवर धारदार शस्त्राने हल्ला; पत्नीचा मृत्यू, पती गंभीर
पुढील बातमी
खेड येथे दुचाकीस्वाराला दांडक्याने मारहाण; दोघांविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा

संबंधित बातम्या