ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत सोळवंडे यांचे निधन; चार दशकांची पत्रकारितेतील वाटचाल; बुधवारी अस्थिविसर्जन

by Team Satara Today | published on : 19 October 2026


सातारा : येथील केसरकर पेठेतील रहिवासी, ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत बाबू सोळवंडे (वय ७२) यांचे सोमवारी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. साप्ताहिक ‘भूमिशिल्प’चे संपादक पद्माकर सोळवंडे यांचे ते वडील होत.
चंद्रकांत सोळवंडे यांनी सुमारे ४० वर्षे विविध दैनिकांतून पत्रकारिता केली. आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजातील विविध प्रश्नांना वाचा फोडत त्यांनी जनसामान्यांच्या समस्या मांडल्या. त्यांच्या निधनाने पत्रकारिता क्षेत्रासह राजकीय व सामाजिक क्षेत्रांत हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, दोन मुली, जावई व नातवंडे असा परिवार आहे. त्यांचा अस्थिविसर्जन विधी बुधवारी (दि. २१ ऑक्टोबर) सकाळी ८ वाजता संगम माहुली येथील कैलास स्मशानभूमीत होणार आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
खा. उदयनराजे भोसले यांनी सपत्नीक घेतले प्रतापगडावरील भवानी मातेचे दर्शन; बळीराजाच्या समृद्धीसाठी घातले साकडे
पुढील बातमी
आरएमसी प्लांट कंपनीमधून 50 हजारांच्या डिझेल चोरीप्रकरणी अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल

संबंधित बातम्या