भाजप उमेदवारांच्या विजयाचा केंद्रबिंदू पाटण ठरणार - ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, पाटण येथे महायुतीचा जोरदार मेळावा

by Team Satara Today | published on : 19 October 2026


पाटण : पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात निवडणुकीत पाटण विधानसभा मतदारसंघ हा विजयाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. सत्यजितसिंह पाटणकर व यज्ञसेन पाटणकर यांनी केलेली मतदार नोंदणी पाहता विजयाचा खरा मानकरी पाटण मतदारसंघांच व पाटणकर हेच असतील, हे मी खात्रीपूर्वक सांगतो. या तालुक्याला महायुतीच्या माध्यमातून सर्वतोपरी ताकद देण्यात येईल. या दोन्ही उमेदवार बहुमताने निवडून आणण्याची जबाबदारी स्थानिक नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर असून त्यांनी विजय अधिक सुखकर व मताधिकाऱ्याचा विक्रम मोडीत काढणारा ठरवावा, असे आवाहन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केले.
पुणे पदवीधर मतदारसंघातील उमेदवार भाजप महायुतीचे उमेदवार सौ. स्मिता योगेश जाधव व शिक्षक मतदारसंघातील उमेदवार कौस्तुभ गावडे यांच्या प्रचारार्थ पाटण येथे आयोजित महायुतीच्या मेळाव्यात त्या बोलत होते.
भाजपाचे सातारा जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुलबाबा भोसले, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार धैर्यशील कदम, राष्ट्रीय खनिज विकास महामंडळाचे संचालक भरत पाटील, भाजपा राज्य परिषद सदस्य आमदार अतुल भोसले म्हणाले, सत्यजितसिंह पाटणकर व यज्ञसेन पाटणकर यांनी या विधानपरिषद निवडणुकांसाठी केलेली मतदार नोंदणी ही निश्चितच कौतुकास्पद असून त्याच्या जीवावर आपले भावी आमदार निवडून जातील, याची मला खात्री आहे.
सत्यजितसिंह पाटणकर म्हणाले, तालुक्यातून आम्ही जास्तीत जास्त मते या दोन्ही उमेदवारांच्या पारड्यात टाकण्याच्या प्रामाणिक व निष्ठेने प्रयत्न करत आहोत. सर्व राजकीय, सामाजिक, तांत्रिक अडचणीवर मात करून पाटणमधून या दोन्ही उमेदवारांचा विजय आम्ही निश्चितच भक्कम करू याची ग्वाही देतो.
डॉ. स्मिता जाधव म्हणाल्या, पदवीधरांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आणि स्थानिक पातळीवर उद्योजक घडवण्यासाठी ५४ तालुक्यांमध्ये कौशल्य विकास केंद्र उभारण्याचा मानस आहे. शेतकरी, युवक, नोकरीच्या शोधात असलेले पदवीधर आणि नवउद्योजक यांना आवश्यक असणारी कौशल्ये लक्षात घेऊन प्रशिक्षणाची व्यवस्था करण्यास आपले प्राधान्य असणार आहे, अशी ग्वाही डॉ. स्मिता जाधव यांनी दिली आहे.
ना. जयकुमार गोरे म्हणाले, भारतीय जनता पक्षाची संघटनात्मक ताकद, केंद्र व राज्य सरकारच्या विकासकामांचा आढावा घेत पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांच्या विजयासाठी कार्यकर्त्यांनी सक्रिय व्हावे असे आवाहन केले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
फटाक्यांऐवजी पुस्तकांचा प्रकाश खरा; हिरवाई प्रकल्पाच्या वतीने यंदा ‘पर्यावरणीय दिवाळी’ साजरी, विद्यार्थ्यांनी शैक्षणिक भेटवस्तू, गोड फराळाचा घेतला आनंद
पुढील बातमी
सातारा जिल्‍ह्याच्या प्रेमाने भारावून गेले : डॉ. स्मिता जाधव; पुणे पदवीधर मतदारसंघातून पहिली महिला आमदार निवडून आणण्याची संधी मतदारांनी द्यावी

संबंधित बातम्या