मांढरदेव (जीवन मांढरे) : रविवार मागील आठ दिवसांपासून नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली असून सर्व ठिकाणी तो अतिशय भक्तिमय,आनंदी वातावरणात साजरा केला जात आहे. परंतु, या उत्साहावर यावर्षी दुष्काळाचे सावट असल्याचे दिसून आले.
यावर्षी पावसाची उशिरा झालेली सुरुवात. त्यासोबत झालेल्या पावसाचे कमी प्रमाण यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे आपण पाहत आहोत.आणि त्याचे दुष्परिणाम आता इतर क्षेत्रावर देखील हळूहळू होत आहेत.
महाराष्ट्र सह परराज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मांढरदेवी काळुबाई या ठिकाणी मागील आठ दिवसापासून नवरात्र उत्सव सुरू झाला आहे. या नवरात्र उत्सव काळामध्ये देवीच्या वारांना म्हणजे मंगळवार, शुक्रवार, रविवार तसेच तिसऱ्या,पाचव्या व सातव्या माळेला देवीचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांचे संख्या लाखोंच्या घरात असते. गेल्या वर्षी झालेल्या नवरात्र उत्सवातील सातव्या माळेला मांढरगडावर देवीच्या दर्शनाला भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. त्या वेळेच्या गर्दीचे प्रमाण एवढी मोठे होती की मांढरदेव पासून कापूरहोळ पर्यंत वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मात्र त्या गर्दीची तुलना या वर्षीच्या गर्दीशी केली तर यावर्षी त्याच्या ५० टक्केच भाविक देवीच्या दर्शनाला आले असल्याचे निदर्शनास आले.
मांढरदेव हे ठिकाण डोंगरावर असून.या ठिकाणी या दिवसांमध्ये थंडीचे प्रमाण प्रचंड असते. परंतु यावर्षी पडलेल्या दुष्काळामुळे आलेल्या भाविकांना कडक उन्हाच्या झळया सहन कराव्या लागत होत्या. आलेले भाविक देवीला महाराष्ट्राला या दुष्काळातून सावरण्याचे बळ देण्याचे साकडे घालत होते.
काळुबाई देवीच्या नवरात्र उत्सवावर दुष्काळाचे सावट; सावरण्याचे बळ देण्याचे देवीला भाविकांकडून साकडे
by Team Satara Today | published on : 18 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा