सातारा : विविध कारणांवरून शारीरिक व मानसिक त्रास दिल्याच्या आरोपावरून सातारा शहर पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जयवंत अशोक कुंभार (रा. लक्ष्मीनगर कॉलनी, संभाजीनगर) यांच्यासह तीन महिलांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
याप्रकरणी विवाहितेने पोलिसांकडे तक्रार दिली आहे. विविध कारणांवरून आपला शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार सातारा शहर पोलिसांनी संबंधित चौघांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास हवालदार यादव करीत आहेत.
विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी चारजणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा
by Team Satara Today | published on : 17 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा