सातारा : सातारा शहरातील गोडोली नाका हा वाहतुक व दळणवळणाच्या दृष्टीने अतिशय वर्दळीचा व गर्दीचा चौक आहे. या चौकाला लागुन असणार्या लिंबखिंड खिंडवाडी रस्ता प्र.जि.मा.30कि.मी/500 व कि.मी 10/650 मधील पालवी हॉटेल जवळील लहान पुलाचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागाकडुन चालु होणार आहे. या कामामुळे शिवराज पेट्रोल पंप मार्गे कराड- कोल्हापुर बाजुकडुन सातारा शहरात प्रवेश करणारी वाहने तसेच गोडोली नाका शिवराज पेट्रोल पंप मार्गे कराड-कोल्हापुर बाजुकडे जाणार्या वाहनांमुळे सदर कामात अडथळा निर्माण होवुन वाहतुक कोंडी निर्माण होण्याची शक्यता आहे. तरी सदर ठिकाणी उपाययोजना करणे गरजेचे आहे. त्यासाठी. पुढीलप्रमाणे वाहतुक मार्गात बदल करणे अत्यावश्यक आहे.
याबाबत पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले आहे की, दि. 22 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वा.पासुन ते दि. 31 डिसेंबर मध्यरात्रीपर्यंत खालील मार्गावर पुढीलप्रमाणे वाहतुक मार्गात बदल करण्यात येत आहे.
वाहतुकीकरीता बंदी घालण्यात आलेला मार्ग
1) सातारा शहरातुन गोडोली नाक्यावरून शिवराज पेट्रोल पंप मार्गे कराड-कोल्हापुर बाजुकडे जाणार्या सर्व प्रकारच्या वाहनांना सदर रस्त्यावर बंदी घालण्यात येत आहे.
2) कोल्हापुर-कराड मार्गे शिवराज पेट्रोल पंप मार्गे गोडोली नाक्यावरून सातारा शहरात प्रवेश करणार्या सर्व प्रकारच्या वाहनांना सदर रस्त्यावर बंदी घालण्यात येत आहे.
वाहतुकीकरीता पर्यायी मार्ग
1) कोल्हापुर-कराड बाजुकडुन येणारी सर्व प्रकारची वाहने ही अजंठा चौक मार्गे गोडोली नाक्यावरून सातारा शहरात प्रवेश करतील.
2) सातारा शहरातुन कोल्हापुर - कराड बाजुकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने ही पोवई नाका-गोडोली नाका-अजंठा चौक मार्गे कराड-कोल्हापुर बाजुकडे जातील.
3) सातारा शहरातील रहिवासी यांना अंतर्गत वाहतुकीसाठी ( सर्व प्रकारची अवजड वाहन वगळून) अजंठा चौक -तलाठी कॉलनी - फॉरेस्ट कॉलनीतुन लिंबखिंड खिंडवाडी मार्गावर येवुन वाहतुक करतील.
4) सातारा शहरातील रहिवासी यांना अंतर्गत वाहतुकीसाठी (अवजड वाहन वगळून) गोडोली चौक - पालवी चौक - गोळीबार मैदान जगदाळे बाग मार्गे लिंबखिंड खिंडवाडी रस्ता या मार्गाचा वापर करतील. -
या बदलाची सर्व नागरिकांनी नोंद घेवून पोलीस दलास सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी केले आहे.
सातारा शहरातील गोडोली नाका परिसरातील वाहतुकीत बदल; नागरिकांनी नोंद घेवून पोलीस दलास सहकार्य करावे
by Team Satara Today | published on : 17 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा