अचानक पगार थांबवल्याने सांख्यिकी विस्तार अधिकारी संघटनेची आंदोलनाची घोषणा; राज्याध्यक्ष संतोष ठोंबरे यांची माहिती

by Team Satara Today | published on : 17 October 2026


सातारा : एक सप्टेंबरपासून अचानक पगार थांबवल्याने बालविकास महिला व बालविकास विभागाच्या सांख्यिकी विस्तार अधिकाऱ्यांनी 22 ऑक्टोबर पासून काम बंद आंदोलनाची घोषणा केली आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद सांख्यिकी विस्ताराधिकारी संघटनेचे राज्याध्यक्ष संतोष ठोंबरे यांच्या सहीचे निवेदन सर्व स्तरावरील मान्यवरांना देण्यात आले आहे.
जिल्हा परिषदेच्या बालविकास विभागातील सांख्यिकी विस्तार अधिकारी यांना ग्रामविकास खात्यामध्ये पंचायत विस्तार अधिकारी पदावर नेमले जाणार आहे. परंतु अजून त्यांचा आकृतीबंध तयार नाही. त्यांचे काम अंतिम टप्प्यात आहे. अशा परिस्थितीत सांख्यिकी विस्तार अधिकारी यांचे सेवा देण्याचे अविरत काम बाल विकास विभागात चालू आहे. तरीही त्यांना केवळ प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे पगार न देणे अनुचित आहे. बालविकास विभागाच्या पदाच्या आकृतीबंधातून सांख्यिकी विस्तार अधिकारी यांना वगळण्यात आल्यामुळे त्यांचे वेतन थांबवण्यात आले आहे.
पगार पत्रकातून सांख्यिकी विस्तार अधिकारी यांना वगळण्यात आले
सध्या कामावर रुजू असून सुद्धा वेतन थांबणे चुकीचे  आहे आणि त्यामुळे कित्येकांना घर चालवणे सुद्धा अवघड आहे सणासुदीच्या दिवसात तर अधिकच कठीण होऊन बसले आहे. सप्टेंबर महिन्याची सेवा केल्यानंतर तसेच ऑक्टोबर महिन्याचे बारा दिवस सेवा केल्यानंतर अचानक पगार पत्रकातून सांख्यिकी विस्तार अधिकारी यांना वगळण्यात आले त्यामुळे सर्वच या पदावरील कर्मचाऱ्यांना आर्थिक आणि मानसिक धक्का बसला असून घरात सुद्धा अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.याबाबतीत सातारा जिल्हा परिषदेचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी म्हणजेच अंगणवाडी विभागाचे जिल्ह्याचे प्रमुख ज्यांच्या अंतर्गत सांख्यिकी विस्ताराधिकारी काम करत आहेत.
डॉ. प्रिया शिंदे यांच्या कडून कार्यवाही करण्याचे आश्वासन
अंगणवाडी विभागाचे जिल्ह्याचे प्रमुख अधिकारी जिल्हा कार्यक्रमाधिकारी नागेश ठोंबरे यांना त्यांना याबाबत भेटले असता त्यांनी शासन स्तरावरून काही सूचना येईपर्यंत पगार काढण्याबाबत असमर्थता व्यक्त केली शासन स्तरावरून कोठून तरी ग्रीन सिग्नल आल्याशिवाय कोणतेतरी पत्र कागद आल्याशिवाय आम्ही पगार काढू शकत नाही, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले तसेच बालविकास विभागाच्या आयुक्त कार्यालयातून मंत्रालयाकडे याबाबतचा अहवाल जाणे आवश्यक आहे. हा अहवाल आयुक्त माधवी सरदेशमुख यांनी तातडीने पाठवणे गरजेचे आहे. तो अजून गेलेला नाही असे त्यांनी सांगितले. याबाबत जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. प्रिया शिंदे यांना संघटना भेटली असता त्यांनी याबाबत कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सहाय्यक कृषि अधिकारी संघटना फलटण तालुकाध्यक्षपदी विलास काळे यांची निवड
पुढील बातमी
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर निकृष्ट चारा सकस करण्यासाठी युरिया प्रक्रिया उपयुक्त; पशुसंवर्धन विभागाचा पशुपालकांना चारा व्यवस्थापनाचा पर्याय; उपलब्ध कुटारातून पौष्टिक चारा तयार करण्याचे आवाहन

संबंधित बातम्या