ग्राहक पंचायतीच्या सातारा शहराध्यक्षपदी रवींद्र औताडे; उपाध्यक्षपदी डॉ. अशोक पाटील, सचिवपदी अनिल मोरे

by Team Satara Today | published on : 16 October 2026


सातारा : शाहूपुरीतील सेवानिवृत्त शासकीय अधिकारी व सामाजिक कार्यकर्ते रवींद्र औताडे यांची महाराष्ट्र ग्राहक पंचायतीच्या सातारा शहराध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली.
शहरातील ग्राहक चळवळीत काम करणाऱ्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक महाराष्ट्र ग्राहक पंचायतीचे सातारा जिल्हा शाखेचे कोषाध्यक्ष नंदकुमार काटे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत रवींद्र औताडे इतर पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या.
यावेळी सातारा शहर शाखेच्या इतर कार्यकारणीमध्ये उपाध्यक्षपदी डॉ. अशोक पाटील, संघटकपदी धनंजय इनामदार, सचिवपदी अनिल मोरे, कोषाध्यक्षपदी सुरेश दुदुस्कर यांची तर सदस्यपदी विजय येवले, गौरव कासट, प्रवीण राठी, चेतन शहा यांची निवड करण्यात आली.  कायदेशीर सल्लागारपदी ॲड. श्रीराम देव यांची निवड करण्यात आली.
 यावेळी शाहूपुरी ग्राहक केंद्राचे संचालक आर. के. जाधव तसेच कोषाध्यक्ष नंदकुमार काटे यांनी ग्राहक चळवळी संदर्भात मार्गदर्शन केले व नवीन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. धनंजय इनामदार यांनी आभार मानले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
एसटी बसमधील प्रवासात महिलेचा विनयभंग; मुंबई सेंट्रल-कोरेगाव बसमधील प्रकार
पुढील बातमी
'हिरवाई'च्या रौप्यमहोत्सवी दिवाळीचा शनिवारी उपक्रम; प्रदूषणमुक्त दिवाळीचा संदेश; सर्वांनी सहभागी व्हावे - प्रा. संध्या चौगुले

संबंधित बातम्या