जिल्हा परिषदेत सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी एकावर गुन्हा

by Team Satara Today | published on : 15 October 2026


सातारा : सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी एका विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 14 रोजी सकाळी सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास सातारा जिल्हा परिषदेतील मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयाच्या दरवाजाजवळ बसून अर्वाच्य भाषेत आंदोलन करणाऱ्या तुषार मोतलिंग (रा. खेड, ता. सातारा) यांच्याविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार भोंडवे करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी इंदोलीच्या एकावर गुन्हा
पुढील बातमी
देगाव फाटा येथे जुगार अड्ड्यावर छापा; एकावर कारवाई

संबंधित बातम्या