सातारा : घरात घुसून एकास मारहाण केल्या प्रकरणी चार जणांविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 13 रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास योगेश यशवंत माने (रा. खेड, ता. सातारा) यांना घरात घुसून हाताने व काठीने मारहाण करून दमदाटी केल्याप्रकरणी तेथीलच सागर विठ्ठल राक्षे, विठ्ठल राक्षे आणि दोन महिला यांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस हवालदार सूर्यवंशी करीत आहेत.
खेड येथे घरात घुसून मारहाण केल्या प्रकरणी चार जणांवर गुन्हा
by Team Satara Today | published on : 15 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा