हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी युवकावर कारवाई; सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

by Team Satara Today | published on : 14 October 2026


सातारा : सातारा जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आलेले असतानाही कोणतीही लेखी परवानगी न घेता सातारा शहरात वावरताना आढळून आल्याने रोहित जितेंद्र भोसले (वय 27, रा. प्रतापसिंहनगर, खेड, सातारा) याच्याविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल मच्छद्रिंनाथ शिवाजी माने (वय - 30, नेमणूक सातारा शहर पोलीस ठाणे) यांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. 13 ऑक्टोबर) दुपारी 1.50 वाजण्याच्या सुमारास शाहू चौक ते चारभिंतीकडे जाणार्‍या रस्त्यावरील वळणावर असलेल्या बंद टपरीजवळ रोहित भोसले हा आढळून आला. त्याला दोन वर्षांसाठी संपूर्ण सातारा जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले होते. असे असतानाही हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक, सातारा किंवा महाराष्ट्र शासनाची लेखी परवानगी न घेता जिल्ह्यात प्रवेश करून वावरल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलीस हवालदार साबळे तपास करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
महामार्गावर सातारा तालुक्यातील खेड गावच्या हद्दीत डंपरची दुचाकीला धडक; वृद्धाचा मृत्यू
पुढील बातमी
सातारा शहरातील मंगळवार पेठ येथे गळफास घेऊन युवकाची आत्महत्या

संबंधित बातम्या