बॉम्बे रेस्टॉरंट चौक परिसरातील आदित्यनगरीत जमिनीच्या वादातून युवकावर चाकूने वार; चारजणांवर गुन्हा

by Team Satara Today | published on : 14 October 2026


सातारा : बिल्डिंगच्या पार्किंगच्या जागेवरून झालेल्या वादातून तरुणाला चाकूने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची, तसेच जातिवाचक शिवीगाळ केल्याची घटना सातार्‍यातील बॉम्बे रेस्टॉरंट चौक परिसरातील आदित्यनगरी येथे घडली. याप्रकरणी चार जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी वरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीकांत मोहन गडांकुश (वय 37, रा. प्लॉट क्रमांक 4, अष्टविनायक अपार्टमेंट, पिरवाडी, सातारा) हे या प्रकरणातील फिर्यादी आहेत. 11 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास आदित्यनगरी, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, सातारा येथील इमारतीच्या पार्किंगमध्ये पार्किंगच्या जागेवरून वाद झाला. या वादातून संभाजी दिलीप कदम, अनिल दिलीप कदम, काजल दिलीप कदम, अनिल कदम यांची पत्नी आणि अन्य दोन अनोळखी व्यक्तींनी फिर्यादी यांच्या सासू अस्मिता काळे यांना हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तसेच, संशयित आरोपींनी फिर्यादी यांना जातीवाचक शब्दांत शिवीगाळ केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. दरम्यान, फिर्यादी यांच्या गळ्यातील सव्वा तोळा वजनाची सोन्याची चैन चोरी करण्याच्या उद्देशाने हिसकावून नेल्याचेही तक्रारीत नमूद आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
शिवसेनेचा पाठिंबा मिळाल्यास तो माझ्यासाठी आशीर्वादच; एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या पाठिंब्याबाबत सानप यांची सकारात्मक प्रतिक्रिया
पुढील बातमी
विवाहितेच्या विनयभंग व सासू, सासरे आणि पतीला मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा

संबंधित बातम्या